top of page

आनंदित झालो की आपण सारेच हसतो...


पण कधीतरी एखाद्या निस्तेज निष्पाप निरागस चेहऱ्यावर हास्य फुलवून बघा...


हा आनंद अविस्मरणीय अवर्णनीय आणि अनमोल असेल...

आमच्या विषयी

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ।

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत् ।।


अर्थात सगळे सुखी-समाधानी होऊदेत. सगळ्यांना निरोगी आणि निरामय आयुष्य लाभुदेत. सगळ्यांना आनंदी-मंगलमय क्षणांचा अनुभव मिळूदे. कोणच्याही वाट्याला कणभर देखील दुःख येऊ नये...


अर्थात हा एक सुंदर सकारात्मक विचार आहे. आणि त्यात काहीच चुकीचे नाही... किंबहुना असे व्हावे... प्रत्यक्षात असे घडावे... हा प्रत्येकाच्याच मनातला नैसर्गिक विचार आहे... पण प्रत्यक्षात मात्र असे होताना... घडताना दिसत नाही... आपल्या आजूबाजूला जर डोळसपणे पाहिले तर आपला अनुभव काही वेगळाच असतो... अनेकदा आपल्याला स्वत:ला नकारात्मक वाईट अनुभव येतात किंवा आपण अशा बातम्या वाचतो की आपण हादरतो... कोसळतो... अस्वस्थ होतो... आपला माणुसकीवरचा... सत्यावरचा... चांगुलपणावरचा विश्वास उडतो... अज्ञान, अन्याय, अत्याचार, भेदाभेद, विषमता, अपघात, दुर्घटना, पूर, दुष्काळ, प्रदूषण, आजार, दु:ख, वेदना, एकाकीपणा, भुकबळी, चोरी, लुटमार, फसवणुक, घोटाळे, बेकारी... काही मानवनिर्मित तर काही निसर्गनिर्मित घटनांची अशी ही अमर्याद यादी... मन विषन्न करणारी...

अधिक जाणून घ्या

ABOUT US

संस्थेचे स्वप्न... विझन !

समाजातील प्रत्येकाला सुखी, समाधानी, निरोगी, सुंदर, आनंदी आणि सुगंधी जगण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, आत्मबळ, प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याकरिता संस्था अखंड प्रयत्नशील राहील आणि एक आदर्श आधारस्तंभ म्हणुन जगभरात प्रसिध्द होईल.

संस्थेचे कार्यस्वरूप... मिशन !

संस्थेच्या माध्यामातून समाजातील गरीब, असहाय्य, दुर्लक्षित घटकामधील प्रत्येक गरजू वंचिताला स्वावलंबी, सक्षम करणे. अबला मुली व एकल महिलांचे सबलीकरण करणे. सुशिक्षित / अशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन सुयोग्य रोजगार उभा करणे. प्रत्येक अनाथाला मायेचा हात देणारं आणि निराधार वृद्धांना आपुलकीचा आधार देणारं हक्काचे घरकुल उभारणे आणि ते अधिकाधिक परिपुर्ण, सक्षम व बळकट करीत रहाणे. संस्थेची आर्थिक बाजू मजबुत करण्यासाठी सेंद्रिय शेती व पूरक उद्योगधंदे उभारणे.

संस्थेची प्राधान्य तत्त्वे...!

सामाजिक बांधिलकी | प्रामाणिकपणा | प्रशिक्षण | सक्षमीकरण | उत्कृष्टता | पारदर्शक व्यवहार | नियोजन

संस्थेचे ध्येय... गोल...!

१५ ऑगस्ट २०२५ पर्यंत किमान ५००० व्यक्तींच्या आयुष्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवुन त्यांना सुंदर, सुगंधी, आनंदी
आणि आदर्श जगण्याचा अनुभव देणे.

VALUES

~ विनम्र आवाहन ~

जर कोणत्याही कारणाने आपण...

 

निराश झाला असाल तर इतरांना आनंद द्या...

प्रेमाच्या शोधात असाल तर इतरांना प्रेम द्या...

असहाय्य वाटत असेल तर इतरांना सहाय्य करा...

अस्वस्थ वाटत असेल तर इतरांना स्वस्थ करा...

एकटे वाटत असेल तर इतरांना सोबत करा...

 

मित्रांनो,

‘वसंत मालिनी आधार आश्रम’ ही आपलीच संस्था आहे... चला, एकत्र येऊन आपण हे जग सुंदर, आनंदी आणि सुगंधी करूयात...
आम्ही सुरुवात केली आहे... 
आपले देखील मन:पुर्वक स्वागत आहे.

 

सध्या ट्रस्ट बांधणीच्या आणि विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर असुन ट्रस्टची स्वतःची जागा, आश्रम वास्तू आणि उद्योग प्रकल्प उभारण्यासाठी व भविष्यातील आदर्श ध्येय-स्वप्नांसाठी सुरुवातीची मदत साखळी आम्ही उभारत आहोत... आपणही यात आपल्या आर्थिक अथवा कोणत्याही स्वरूपातला प्रत्यक्ष कृतीशील सहभाग नोंदवू शकता. आपणां सर्वांना ह्या उपक्रमात यथायोग्य सहभाग देण्याचे विनम्र आवाहन आम्ही करीत आहोत.


धन्यवाद!!!

‘वसंत मालिनी आधार आश्रम’

APPEAL
CONTACT

COMMITTE

Kishor Vasant Mane  91758 22933 (Chairman) 

Pravin Vasant Mane  8169459804 (Secretary)

Dr Aarti Pravin Kharat  95946 94150 (Treasurer)

Vilas Damu Waghmare  84240 11119 (Member)

Ganesh Pundalik Raorane  98694 44587 (Member)

Prof Sunita Mukesh Patil  98691 01087 (Member)

Shripat Jayram Thorat  98217 58814 (Member)

 

Vasant Malini Aadhar Ashram
Maharashtra / 1676 / 2017 / GBBSD

Office - B-007/85, Suryakirti Tower, Chembur Lokmanya CHS Ltd., Tilak Nagar, 
Chembur, Mumbai - 400089. MH. INDIA.

022 2526 04 60  I  9175 82 29 33  I  info@vmaa2025.org  I  www.vmaa2025.org 

 

Thanks! Message sent.

bottom of page